मुलुंडमध्ये रंगणार २३ वे गिरिमित्र संमेलन
युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाची संमेलन संकल्पना
महाराष्ट्र सेवा संघातर्फे ११ व १२ जुलै रोजी मुलुंड येथे २२ वे ‘गिरिमित्र संमेलन’ आयोजित करण्यात आले असून, यंदाची संकल्पना ‘युद्धभूमीवरील गिर्यारोहण’ अशी आहे.
लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी आणि लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी हे सियाचीनमधील ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन राजीव या मोहिमांवरील अनुभव मांडणार आहेत. नायब सुभेदार बाना सिंग हेही आपले अनुभव कथन करतील.
लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी हे सन १९८७ मध्ये मेजर होते. ते सियाचेन क्षेत्रातील पायदळ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) होते.
त्यांनी ऑपरेशन राजीव या संपूर्ण मोहिमेसाठी सामरिक नेतृत्व, नियोजन, नियंत्रण आणि देखरेख केली. उत्तर सीमाक्षेत्रातील लष्करी कारवाईची सर्वोच्च जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
नायब सुभेदार बाना सिंग यांच्याकडून उलगडले जाणार आहेत. जून १९८७ – सियाचेन, २१,००० फूट उंची.
नायब सुबेदार बानासिंग यांनी जवानांसह १,५०० फूट उंच बर्फाच्या भिंतीवर चढाई केली. जवळ जवळ अभेद्य मानली जाणारी हिमशिखर चौकी मुक्त करण्यात त्यांनी यश मिळवले.
तसेच लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी १९८४मध्ये सियाचेन ग्लेशियर येथे १८,००० फूट उंचीच्यावर ऑपेरेशन मेघदूतची सुरुवात केली. या मोहिमेत संजय कुलकर्णी यांनी उत्कृष्ट नेतृत्व, अदम्य शौर्य, अतिउंचीवरील गिर्यारोहण कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून पराक्रम केला. त्या पराक्रमाची गाथा ही गिरिमित्र संमेलनात कथन केली जाईल.
वैयक्तिक गिर्यारोहण आणि राष्ट्ररक्षणासाठीच्या गिर्यारोहणातील फरकही या निमित्ताने स्पष्ट केला जाणार आहे. गिरिमित्र संमेलनात छायाचित्र प्रदर्शन, माहितीपट, साहसी विषयांवरील संवाद, ब्लॉग, छायाचित्रण आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या रील्स स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत.
या संमेलनात सहभागी होण्याकरिता अधिक चौकशीसाठी व ऑनलाईन बुकिंगसाठी
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
तसेच ऑफलाईन बुकिंगसाठी
श्रीकर पिसोळकर – 9869790146
अमेय बोले – 9869458462 इथे संपर्क साधावा असे आवाहन गिरिमित्र संमेलन आयोजकांनी केले आहे..
































