मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतल्या जिल्हा निहाय आढावा बैठका
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात अन्न नागरी पुरवठा विभागांतर्गत वितरीत करण्यात येणा-या प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेच्या इष्टांक अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाईन माध्यमाद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतला.
ज्या जिल्हयाने इष्टांक पूर्तता केली आहे , त्यांना मागणी असल्यास वाढीव इष्टांक देण्यासंदर्भात तसेच ज्या जिल्ह्याना इष्टांक पूर्तता केली नाही त्यांचा उर्वरित इष्टांक इतर जिल्हयांना हस्तातंरित करण्यासंदर्भात यावेळी मंत्री मुंडे यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला.