राजकीय कारणासाठी सिनेसृष्टीतील महिलांच्या नावाचा वापर निंदनीय असून असे वागणे राजकारण्यांना शोभत नाही – प्राजक्ता माळी

 राजकीय कारणासाठी सिनेसृष्टीतील महिलांच्या नावाचा वापर निंदनीय असून असे वागणे राजकारण्यांना सोबत नाही – प्राजक्ता माळी

चिखलफेक होऊ नये, म्हणून मी गप्प बसले. पण लाखोंचे प्रतिनिधित्व करणारे आमदार जेव्हा चिखलफेक करतात. तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावे लागते. माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांचा निषेध करते. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता ? आपला टीआरपी वाढविण्यासाठी कोणत्याही थाराला जातात. तुमच्या राजकारणासाठी आमच्या सारख्या महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ? असा संतप्त सवाल करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सवाल मांडला यावेळेस त्यांना अश्रू अनावर झाले होते.

या गोष्टींचा माझ्या कुटुंबावर परिणाम होत आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना ही गोष्ट भूषणावह नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन धस यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

महिला कलाकारांची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. कलाक्षेत्र बदनाम नाही. तुमच्या स्वार्थासाठी राजकारणी कलाक्षेत्र बदनाम करत आहेत. यापूर्वी अनेक नेत्यांबरोबर कार्यक्रम केले आहेत. महिलाच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात. माझ्यावर टिप्पणी करून स्वत:ची मानसिकता दाखवून दिली आहे, ही खेदाची बाब आहे. फोटोचा संदर्भ घेऊन कुणासोबतही संबंध कसा काय जोडता? असा सवालही माळी यांनी केला.

पुरूषांच्या मदतीशिवाय एक महिला स्वतः च्या पायावर उभी राहू शकत नाही का?, असा संतप्त सवाल व्यक्त करताना माळी यांना अश्रू अनावर झाले. राजकीय कारणासाठी सिनेसृष्टीतील महिलांच्या नावाचा वापर निंदनीय असून असे वागणे राजकारण्यांना सोबत नाही.

चिखलफेक होऊ नये, म्हणून मी गप्प बसले. पण लाखोंचे प्रतिनिधित्व करणारे आमदार जेव्हा चिखलफेक करतात. तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावे लागते. करुणा मुंडे यांनीही काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळीही मी नोटीस देणार होते, असेही त्यांनी सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns