… आणि भाऊ कदम बनला सिरियल किलर

*सिरियल किलर भाऊ कदम*
*१२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ*

अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल किलर’ ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.

मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर ‘सिरियल किलर’ म्हणून आलेला खरंच ‘सिरियल किलर’ असतो की नसतो ? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला ‘सिरियल किलर’ काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं ‘सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल’ असा विश्वास अभिनेते भाऊ कदम व्यक्त करतात. ‘नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे’.

नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns