‘जय शंकरा’चे स्वर कानावर पडताच पडदा दूर होऊन ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाने रसिकांचे कान तृप्त केले

*’जय शंकरा’चे स्वर कानावर पडताच पडदा दूर होऊन ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाने रसिकांचे कान तृप्त केले*

सांगली दि. २८. – खास प्रतिनिधी

.. आणि ‘जय शंकरा’चे सूर कानावर पडले व हळूहळू पडदा दूर होऊन रसिकांच्या तुडुंब गर्दीत ‘संगीत मंदारमाला’चा प्रयोग सादर करण्यात आला.

येत्या ५ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्यपंढरी सांगली नगरी नटून थटून तयार झाली आहे.

मुहूर्तमेढ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आज येथे संगीत भूषण पं. राम मराठे आणि ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाचा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात रसिकांच्या तुडुंब गर्दीत सादर करण्यात आला.

त्यापूर्वी पं. राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे आणि विद्याधर गोखले यांचे चिरंजीव विजय गोखले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यावर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

“जय शंकरा”च्या सुरांत पडदा दूर होऊन प्रयोग सादर झाला.

IPRoyal Pawns