*शाळकरी वयातल्या प्रेमाची धमाल ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात*
*’रंगीले फंटर’ चित्रपटातून उलगडणार मनातला हळवा कोपरा*
*शाळेतील पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘रंगीले फंटर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च*
*ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांची निर्मिती असलेला ‘रंगीले फंटर’*
– *निशांत धापसे दिग्दर्शित ‘रंगीले फंटर’*
शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक महोत्सवांमध्ये गौरवालेला हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन, नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे.कला दिग्दर्शक प्रकाश शिनगारे आणि कार्यकारी निर्माता म्हणून
बाबासाहेब पाटील यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात हंसराज जगताप, रुपेश बने, जीवन करलकर, यश कुलकर्णी, मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, सिया पाटील, पलक अडसूळ, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते अशी दमदार स्टारकास्ट आहे.
‘रंगीले फंटर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधून चार शाळकरी मित्र एकच मुलगी पटवण्यासाठी धडपडत असतात. त्या दरम्यान घडणाऱ्या धमाल घडामोडी आणि त्यात त्यांचं अडकणं याचं मजेशीर कथानक आहे. शाळा, पहिलं प्रेम हा प्रत्येकाच्या मनातला हळवा कोपरा असतो. त्याचंच चित्रण या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच हा चित्रपट नक्कीच पुरेपूर मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी आता केवळ ३ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.