हिंदुत्वासाठी बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे टोळी यांच्या विरोधात वक्तव्ये केल्यामुळे माझे खुप नुकसान झालं असून मला २०-२५ ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला रातोरात काढून टाकलं आणि यामुळे वर्षाला ३०-४० कोटींचे नुकसान झाले, पण मी स्वतंत्र आहे आणि मला असं म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
*कंगनाने दिले एलॉन मस्कचे उदाहरण*
कंगना पुढे म्हणाली की, ‘कंपन्या आणि त्यांचे कॉर्पोरेट ब्रँड हेड भारताच्या संस्कृतीचा आणि अखंडतेचा तिरस्कार करतात. मी मस्कचं कौतुक करते, कारण प्रत्येकजण त्यांच्या कमकुवतपणा दर्शवितो, कमीतकमी श्रीमंत व्यक्तीने पैशाची काळजी करू नये.’
*छायाचित्र सौजन्य इन्स्टाग्राम*