झाले गेले विसरून, आता एकदिलाने काम करा!
*प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहचा ६० पैकी ५२ जागांवर दणदणीत विजय.*
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गेली पाच वर्ष अंतर्गत वादांमुळे चर्चेत होती धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, एकमेकांवर केस करणे हे प्रकार घडले त्यात करोनाकाळात नाट्यसृष्टी ठप्प झाल्यानंतर परिषदेने गरजूंना आर्थिक साहाय्य केले होते. परंतु त्यावरूनही परिषदेमधील दोन गटांमध्ये वाद झाले. परंतु १६ तारखेला पंचवार्षिक निवडणूक होऊन आपलेच नाट्यकर्मी निवडून आले आहेत, तर आता तो या पॅनलचा तो त्या पॅनलचा न करता सर्वांनी मिळून नाट्यसृष्टीसाठी भरीव योगदान येत्या पाच वर्षात करायला हवे कारण मागची पाच वर्ष कोविड व इतर काही कारणामुळे खूपच नुकसानीत गेली आहे. पुढील पाच वर्षात आपल्यापुढे खूप काही काम करायचे असून यात १०० वे नाट्य संमेलनही आहे तसेच यशवंत नाट्य मंदिराची वास्तू सुद्धा नवीन बांधायची आहे तेव्हा हेवेदावे सोडा व एक दिलाने पुढील पिढीस तुमचा आदर्श घालून द्या.
***दरम्यान प्रसाद कांबळी व दिलीप जाधव यांच्या मतांच्या बेरीज मध्ये फारच कमी संख्येचा फरक असल्याने तसेच दिलीप जाधव यांच्या म्हणण्याप्रमाणे सकृत दर्शनी मतमोजणीत गोंधळ झाल्याने त्यांनी फेर तपासणीसाठी अर्ज केला आहे***
१६ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लागली आणि जो तो आपण हे काम केले, ते काम केले याची जंत्रीच विविध माध्यमातून मांडू लागला. नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ ही दोन प्रमुख पॅनल परस्परांसमोर ठाकले. निवडणुकीपूर्वीच राज्यभरातील ६० पैकी २० जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली. अनेक ठिकाणी नेमक्याच उमेदवारांनी अर्ज केल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी म्हटले.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्यभरात एकूण १०३ उमेदवार उतरले असून मतदारांची संख्या २८ हजार ३११ इतकी आहे. राज्यभरात २९ केंद्रांवर हे मतदान होणार असून या निवडणुकांचे मतदान केंद्र हे माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ मंदिर हे होते. रविवारी (१६ एप्रिल) सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान झाले. सकाळ पर्यंत निकाल हाती आले ( अधिकृत निकाल १९ तारखेला लागणार आहे ) मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने विजयी ठरले आहेत. मुंबई उपनगरात दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या आहेत तर दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत. ( ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर )
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल
रंगकर्मी नाटक समूह
१) प्रशांत दामले (७५९)
२) विजय केंकरे (७०५)
३) विजय गोखले (६६४)
४) सयाजी शिंदे (६३४)
५) सुशांत शेलार (६२३)
६) अजित भुरे (६२१)
७) सविता मालपेकर (५९१)
८) वैजयंती आपटे (५९०)
“आपलं पॅनल”
९) सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७)
१०) प्रसाद कांबळी (५६५)
मुंबई उपनगर जिल्हा मतदानाचा निकाल
१] ऐश्वर्या नारकर ४०८
२]अविनाश नारकर ४०७
३]संजय देसाई ३८१
४]उदयराजे शिर्के ३७०
नागपूर. ०३
बीड. ०२
नगर. ०३
सोलापूर. ०६
धुळे. ०१
बोरिवली. ०२
सांगली. ०३
वाशीम. ०२
ठाणे. ०३