जेष्ठ गायिका आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत

जेष्ठ गायिका आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत

आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या
पद्मविभूषण आशा भोसले यांना आज ( शुक्रवारी ) भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन २०२१ या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानचिन्ह आणि २५ लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यावेळी उपस्थित होते. निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येतं.

यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना आशा भोसले म्हणाल्या की, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली की तीच कौतुक होतं. तसं मला आज वाटतंय. मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्या सारखं वाटतंय.” मी फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतची कन्या आहे. माझे आईवडील, गुरु आणी दीदी यांचा मला आशीर्वाद आहे.

“१९३३ साली सप्टेंबर महिन्यात ‘माझं बाळ’ या सिनेमासाठी मी १० वर्षाची असतांना माझे पाहिले गाणे रिकॉर्ड झाले तेव्हा मी अक्षरशः थरथरत होते. तेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं नव्हतं. तेव्हापासून मी गात आहे आणि गात राहणार.

+1
1.8k
+1
1.8k
+1
0
+1
0
IPRoyal Pawns