अभिनेता चिन्मय मांडलेकरने ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. यावरून चिन्मय मांडलेकरवर टीका करण्यात येत आहे. याला प्रत्युत्तर देतांना चिन्मय म्हणतो “एक कलाकार म्हणून निर्माता म्हणून आपण आपले काम केले पाहिजे. टीका आणि ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज लागत नाही. हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मला या चित्रपटात एकच गोष्ट दिसली. ती म्हणचे या चित्रपटाची कथा. जर चित्रपटातील माहिती सर्वांना मिळणे गरजेचे आहे तर तुम्ही चित्रपटात नायकाची किंवा खलनायकाची भूमिका साकारता याने काही फरक पडत नाही. तुम्ही हिरो आहात, व्हिलन आहात, या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. होय, हे खरे आहे की, नथुराम गोडसे हे पात्र तुम्ही साकारले तर अपोआप वादांमध्ये अडकणार. कारण हे एक वादग्रस्त पात्र आहे. मात्र मी माझ्यावर होणाऱ्या टीकेवर विचार करत बसू शकत नाही. माझे काम अभिनय करणे आहे. वाद घालणे हे माझे काम नाही, या शब्दांत चिन्मय मांडलेकरने ट्रोल करणाऱ्यांना आणि टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. संगीत ए. आर. रहमान यांचे आहे.