मान्यवरांच्या उपस्थितीत ‘तेजोमयी’ चं प्रकाशन संपन्न

असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथाली प्रकाशित चारुशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ चं प्रकाशन संपन्न

उज्वल निकम, डॉ आनंद नाडकर्णी, भरत दाभोळकर, सुबोध भावे, आरती अंकलिकर, भूषण गगराणी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, प्रदीप वेलणकर, रामदास पाध्ये, डॉ समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूरकर यांच्या उपस्थितीत तेजोमयी या ग्रंथाली प्रकाशित आणि चारुशीला निरगुडकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी पार्कच्या सावरकर स्मारकात झालं.

या प्रसंगी राष्ट्रीय पारितोषिक विजेती सावनी रवींद्र यांचं स्वरमयी संगीतिक अभिवादन सादर झालं.
त्यानंतर लेखिका चारुशीला निरगुडकर यांची मुलाखत डॉ समीरा गुजर यांनी घेतली.
त्यानंतर मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी अभिवाचन सादर केलं.
त्यानंतर मंदार , मंजिरी आणि प्रतिभा निरगुडकर यांनी लीला ताईंच्या आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ सुधीर निरगुडकर यांनी केलं.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns