ठाणे येथे चित्रनगरी निर्माणाबाबत …….

ठाणे येथे चित्रनगरी निर्माणाबाबत सिने नाट्य अभिनेता सुशांत शेलार यांनी एकनाथजी शिंदे,
नगरविकास मंत्री – महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री – महाराष्ट्र राज्य,
पालकमत्री – ठाणे जिल्हा यांना भेटून ठाणे येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिननगरी निर्माणाबाबत पत्र दिले.

पत्राचा मायना…
आपण प्रतिनिधित्व करीत असलेला ठाणे जिल्हा हे अनेक मराठी तथा हिंदी सिनेमासृष्टीतील कलाकारांचे माहेर घर आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही, कारण या दोन्ही भाषिक कलाकारांना ठाण्याबद्दलची आपलेपणाची भावना असल्याने त्यांच्यापैकी बहुतांश कलाकार, तंत्रज्ञ यांची घरे सुद्धा याच विभागात आहेत. ठाण्यातील अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी योग्य अशा जागा असल्याने तिथे चित्रीकरणाची कामे चालत असतात. परंतु या सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना आजही तांत्रिक गोष्टींसाठी मुंबई शहरावर बऱ्याच अंशी अबलबून राहावे लागते.

वरील सर्व मुद्घांना अनुसरून ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या आणि ठाण्यावर मनापासून प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या वतीने मी अशी विनंती करतो की, ठाणे येथे मुंबई चित्रनगरीच्या तोडीची सर्व सोईसुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी चित्रनगरी उभी करावी व त्याचे नामकरण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चित्रनगरी असे करावे.

जेणेकस्न ठाण्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यांना ते प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे पडेल त्याच बरोबरीने त्यांची कार्यक्षमतासुद्रा वाढेल. बाळासाहेब हे स्वत: कलाकार असल्याने नेहमीच कलाकारांचा सन्मान व काळजी घेऊन त्यांच्यामागे कायम कणखरपणे उभे राहिले होते, या माध्यमातून बाळासाहेबांना एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली देण्याचा एक प्रयत्न करता येऊ शकतो.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ठाण्याचे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळकतेने कलात्मकदृष्या उमटवण्यासाठी आपण या प्रस्तावाचा योग्य तो विचार कसून निर्णय घ्याल असा विश्वास आहे. सदर विषयामध्ये आपल्याला संपूर्ण सहकार्य आणि आपण द्याल ती जबाबदारी घेण्यासाठी मी कायम कटिबद्द असण्याची ग्वाही या पत्राद्वारे देत आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns