“तुमच्या एक जूनच्या टीव्हीवरील भाषणात तुम्ही असे सांगितले होते की जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण ( मिशन बिगीन अगेन ) पुनश्च हरिओम करीत आहोत. आपण बार, रेस्टॉरंट वरील लॉकडाउन उठवले मात्र देवाला लॉकडाउन मध्येच ठेवले, तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झाला आहात का? ज्याचा तुम्ही खूप तिरस्कार करायचा” असे इंग्रजी मध्ये पत्र माननीय राज्यपाल यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले.
या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्रपणे मात्र सडेतोड उत्तर दिले ” माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाक व्याप्त काश्मीर म्हणण्याऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
दरम्यान, मंदिरासाठी राज्यपालांच्या पत्रावर शरद पवारांची नाराजी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिले पत्र.