जेष्ठ लेखिका शोभा रजनीकांत देशपांडे वय ८० या गुरुवारी दुपारी कुलाबा येथील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करावयास गेल्या होत्या. मात्र तेथील सेल्समन त्यांच्या बरोबर हिंदी मध्ये बोलत होता तेव्हा शोभाजींनी त्याला मराठीत बोलायची विनंती केली मात्र त्याने त्यास नकार देत वर अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलीस बोलवून त्याने जेष्ठ लेखिकेला अपमानित करून दुकान बाहेर काढले याचा निषेध म्हणून सायंकाळ ५ वाजल्यापासून दुकानासमोर ठिय्या मांडून बसल्या पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जो पर्यंत येत नाहीत, आणि दुकानदार परवाना दाखवत नाही तो पर्यंत इथून हलणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली.
७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या शोभा देशपांडे विना अन्नपाण्याच्या त्याठिकाणी आंदोलन करत आहेत.
शोभा देशपांडे एक लेखिका आहेत, मराठी प्रेमी आहेत आणि मराठीचा नेहमी आग्रह करत असतात, त्यातुनच सदर दुकानाच्या गुजराती मालकसोबत त्यांचे खटके उडाले, आणि मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करतेय असे त्यांचे म्हणणे आहे.
इतक्या वयस्कर महिलेचा अपमान करणाऱ्या दुकानदाराचा निषेध!
पोलिसांनी दुकानदारावर कारवाई करावी तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी त्यांना अपमानित केले त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी.
मराठीचा अपमान होत असताना, मराठी पोलिसांनी देखील मराठी महिलेलाच अपमानित करणे हे निंदनीय आहे.