मकरंद मानेंचा ‘मानस’ !

‘रिंगण’ या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आणि दिग्दर्शक म्हणून मकरंद माने यांचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले त्यानंतर अनेक छोटे-मोठे निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी माने यांच्या संपर्कात आले. मात्र माने यांनी चित्रपट समजून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणारा निर्माता मिळेपर्यंत वाट पाहिली. समंजस आणि सर्जनशील दिग्दर्शक माने यांच्या चित्रपटाचा प्रवास हा खरंतर थोडा वेगळा आणि अस्सल ग्रामीण आहे. ग्रामीण भागातील विषय ते अतिशय उत्तमरीत्या हाताळतात. आता लवकरच ते एक दर्जेदार विषय घेऊन येत आहेत.

या नवीन चित्रपटाबद्दल सांगताना माने सांगतात ,”मी एक नवीन आणि वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यक्त होणे हे भावनेशी संबधित असत. माझ्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे विषय तुमच्या आमच्या घरातला अगदी जिव्हाळयाचा आहे एवढंच सध्या मी सांगू शकतो. जुन्या अबोल नात्याची नव्याने उलगडणाऱ्या प्रवासाची कथा मांडण्याचा प्रयत्न करत आहे .चित्रपटाच चित्रीकरण सुरु झालय लवकरच तो आपल्या समोर येईल. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षक पसंती देतील ह्याची मला खात्री आहे. “

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns