टेलिफोन ऑपरेटर ते भारतीय सिनेमाचा महान नायक गुरू दत्त यांच्या जीवनावर बनणार चित्रपट…

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शिका भावना तलवार दिग्गज आयकॉनिक फिल्ममेकर आणि अभिनेता गुरुदत्त यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. गुरुदत्त यांचे आयुष्य तीव्र गुंतागुंतीचे असल्याने त्यांना कथा लिहिण्यास सात वर्ष लागली असे त्या म्हणतात.
मात्र तरीही हा बायोपिक वेब सीरिज स्वरूपात न येता चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचे त्यांनी ठरवले आहे.

“गुरुदत्त यांचे व्यक्तिमत्त्व ‘लार्जर दॅन लाईफ होते’. १० वर्षाच्या आतच त्यांनी एक निर्माता, अभिनेता, चित्रपट व्यवसायिक म्हणून यश मिळवले. गीता दत्तशी प्रेम आणि पत्नी म्हणून झालेला स्वीकार, असे सर्व काही त्यांना मिळाले होते. यासोबतच त्यांनी दुःखही पाहिले होते. यासाठी बर्‍याच चर्चा झाल्या, ज्या मला आणि माझ्या टीमलाच नाही तर प्रेक्षकांच्या नव्या पिढीलाही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास आवडेल असा माझा विश्वास आहे.”

हा एक अतिशय मनोरंजक प्रवास असून गुरुदत्त यांचा टेलिफोन ऑपरेटर ते भारतीय सिनेमाचा एक प्रमुख या अद्भूत प्रवासाची कथा या चित्रपटात मांडली जाणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, “त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे जुळले होते ही एक रंजक गोष्ट आहे. त्यांचे गीता दत्तला भेटणे मग स्टार बनणे आणि पुढे त्यांचे लग्न होणे. हा एक जबरदस्त रंजक प्रवास असून तो सर्व पिढीला आवडेल असे त्या म्हणाल्या.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns