प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे (८०) यांचे निधन.

 

प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती मीनाताई देशपांडे यांचे आज पहाटे अमेरिकेत वयाच्या ८० व्या वर्षी जॉर्जिया येथे दु:खद निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली ..?

दि.१ नोव्हेंबर २०१९ रोजी मीनाताई या आपल्या कन्या डॉ. प्रिया शरद घमंडे यांच्याकडे जॉर्जिया येथे गेल्या होत्या. पण टाळेबंदीमुळे त्या तेथेच अडकून पडल्या. त्यांची कन्या व जावई हे दोघेही डॉक्टर्स आहेत. पण कोरोनाची बाधा झालेल्या मीनाताईंना ते, अथक प्रयत्न करुनही, वाचवू शकले नाहीत.
मीनाताईंचे चिरंजीव हे अमेरिकेत आहेत. पण दूरच्या राज्यात असल्यामुळे ते देखील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

#मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा:
आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रा नंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)
मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
ये तारुण्या ये (कथासंग्रह)
हुतात्मा (कादंबरी)

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns