जर लोकांना वारंवार सांगूनही रेल्वे वरील गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लोकल बंद करावी लागेल- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे –

संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आलेली आहे.
सर्वत्र एकच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे तो म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.
अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.
काल मी आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद मिळतोय . पुढचे १५ -२० दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे
काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या.
अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार
तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता. बँका सुरूच राहतील.
खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे.
या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात.
ज्या आस्थापना, दुकाने बंद करतो आहात त्यांना माझे आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका.

कोरोना व्हायरसशी युद्ध आमचे सुरू – मुख्यमंत्री
आज पासून पश्चिम रेल्वे वरील एसी लोकल बंद.

आरोग्यमंत्री राजेश टोपे –

जे रुग्ण दाखल झाले होते त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, 5 रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचा अर्थ रुग्ण बरा होतो

आज कोरोन रुग्ण वाढलेले आहेत, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथील रुग्णात वाढ. आता महाराष्ट्रातील संख्या 52 झाली आहे.

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करते.

आतापर्यंत जी लक्षण आढळलेली आहेत ते प्रवासी 971 होते व एकूण 1036 प्रवाशांची तपासणी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जी रविवारी सेल्फ कर्फ्युची घोषणा केली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

आता आपण 6 लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या 12 होईल.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns