मुंबतील ३ वर्षाच्या मुलीला वडलांपासून कोरोनाची लागण झाली असून तिच्या आईलाही लागण झाल्याने या सर्वांना कस्तुरभा रुंग्णालयात ठेवण्यात आले आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
पुण्यात 144 कलम लागू पण संचारबंदी नाही – पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
पुढील सूचना मिळेपर्यंत सिध्दीविनायक मंदिर बंद राहणार.
महाराष्ट्रात आता पर्यंत ३८ जणांना कोरोनाची लागण
जिथे लोक गर्दी करताहेत तिथे
वर्क फ्रॉम होम करण्याच्या विनंतीवजा सूचना कंपन्यांना करणार.
लॉकडाउन, शटडाउनचा विषय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे.
१० वी १२ वीच्या परीक्षा सुरू राहणार.
निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची विनंती.
मंत्रालयात सर्व सामान्यांना प्रवेश नाही.
मुंबईतील पब्स डिस्को आजपासून बंद.
ज्या कोरोना संशयितांना घरी ठेवलंय त्यांच्या हाताला शाई लावणार.
उच्च व तंत्रशिक्षण विभागात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे – उदय सामंत.
१७५ टीम संशयितांच्या घरी जाऊन तपासणी करताहेत, १५ हजार घर, ३२ हजार लोकांकडे या टीम आता पर्यंत गेल्या आहेत – पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर.
नाशिक मधील सर्व यात्रा बंद करण्याचा सूचना – नाशिक जिल्हाधिकारी