१००व्या नाट्यसंमेलनाचे भरगच्च कार्यक्रम जाहीर, मात्र करोनाचे सावट

 

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे कार्यक्रम जाहीर झाले असून, २५ मार्चला तंजावर येथून व्यंकोजीराजांचे सुपुत्र दुसरे शहाजीराजे यांनी मराठी मध्ये लिहिलेल्या पहिल्या नाट्यसंपदेला प्रणाम करून १०० व्या नाट्यसंमेलनाची सुरवात होणार असून हे नाट्यसंमेलन तब्बल ८० दिवस महाराष्ट्रभर चालणार आहे.
२७ मार्चला सांगली येथे दिंडी त्या नंतर उदघाटन व नाट्यविषयक कार्यक्रम असेल तर
२८ मार्चला स्थानिक शाखेतर्फे त्यांना जे जे सर्वोत्तम असेल ते ते सादर करू शकतात.
२९ मार्च ला मध्यवर्ती तर्फे सांगलीची एकांकिका ‘ शेवट इतका गंभीर नाही’ ही सादर काण्यात येईल.
त्यानंतर ‘एका दशावतार’ हा दीर्घाक सादर होईल.
गोव्याचे ‘मालशेतची विहीर’
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘विश्वव्यापी जनगणना’ सादर होईल.
एकपात्री मध्ये संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड चाललंय लंडनला’ सादर होईल.
तसेच व्यायासायिक नाटके सादर होणार असून यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ‘मोरूची मावशी’ बालनाट्य ‘निम्मा शिम्मा राक्षस’ ‘आमने सामने’ ‘हिमालयाची सावली’ ‘हरवलेल्या पत्त्यांचा बांगला’ ही असतील.
त्याच प्रमाणे मराठी रंगभूमीविषयक दोन कार्यक्रम होणार असून यात हृषीकेश जोशींची संकल्पना असलेला ‘एक्झाटली १०० वर्षांपूर्वी’ हा एक वेगळा कार्यक्रमही असणार असून दुसरा सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांच्या संकल्पनेतूनही एक कार्यक्रम सादर होणार आहे. मात्र त्याचे नाव अजून ठरले नाही आहे.
२२ ते २५ मार्च सांगली येथे नाट्यजागर होणार असून याची संकल्पना शहाराकडून नाटक पुन्हा ग्रामीण भागाकडे नेण्याचा हा प्रयत्न असेल
२७ तारखेला जागतिक रंगभूमीदिनी सांगली येथे १०० व्या महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलनाचे उदघाटन होईल. उदघाटक म्हणून जेष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे असून स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत, सोबत संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे देखील असतील.
प्रत्येक केंद्रांवर ४ दिवस नाट्यजागर तर ३ दिवस संमेलनातील मुख्य कार्यक्रम असतील यात कोल्हापूर, रायगड, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, नागपूर, कल्याण, नाशिक, बारामती, विदर्भ, मुंबई ही केंद्रे असतील. १०० व्या नाट्यसंमेलनाचा समारोप गो.ब.देवल स्मृतिदिन मुंबई येथे१४ जून रोजी होईल. असे नाट्य पारिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns