फँटसी हॉरर मालिकांमधील भयानक स्थळे कोणत्याही अलौकिक शक्ती किंवा भयानक शैलीमध्ये भयाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. योग्य स्थळाच्या निवडीमुळे भयानक शैली योग्यरित्या सादर करण्यामध्ये मदत होते. शूटिंगसाठी निवडण्यात आलेले योग्य स्थळ पटकथेमध्ये वास्तविक भयाची भर करते. अलौकिक शक्तीसंदर्भात थरारक व काल्पनिक भयानक मालिकांच्या बाबतीत स्थळे अनेकदा भयाची वास्तविकता आणण्यासाठी उत्तम माध्यम ठरू शकतात. असेच काहीतरी एण्ड टीव्हीवरील अलौकिक शक्तीसंदर्भातील काल्पनिक मालिका ‘लाल इश्क’च्या बाबतीत घडले आहे. निर्मात्यांनी अनेकवेळा भयावह ठिकाणी शूटिंग केली आहे. मिरा रोडजवळ चीना क्रीक, दहिसरजवळ त्रिमूर्ती स्टुडिओ, बंद असलेली जुनी हवेली आणि अशा अनेक भयावह ठिकाणी शूटिंग करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध भयावह पटकथांचे शूटिंग करताना टीमला वास्तविकत: भयानक अनुभव मिळाला आहे.
या भयावह ठिकाणी शूटिंग करण्याबाबत बोलताना रिचा यामी म्हणाली, ”फँटसी हॉरर मालिकेची निर्मिती करणे अत्यंत आव्हानात्मक आहे, पण तितकेच प्रशंसनीय देखील आहे. स्थळ निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावते, ते संपूर्ण भयावह कथेमध्ये वास्तविक थराराची भर करते. आम्ही झपाटलेल्या ठिकाणी शूटिंग केलेली नाही, पण आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग केली आहे, तिथे कलाकार व टीमला वास्तविक भयावह अनुभव मिळाला आहे. असे स्थळ संपूर्ण शूटिंग अनुभवाला आणि पटकथेला टेलिव्हिजन स्क्रिनवर अत्यंत रोमांचक व मनोरंजनपूर्ण बनवते. तसेच पडद्यामागील अनुभव पडद्यावरील सादरीकरणांमध्ये देखील अधिक वास्तविकतेची भर करतात.”
भयावह पटकथा, भयावह मॉन्स्टर्स आणि भयावह स्थळ व सेटअप्सला अधिक पुढे घेऊन जात मालिका या सप्टेंबरमध्ये सूडाने भरलेल्या थरारक व भयावह कथा सादर करणार आहे.
सूडाने पेटलेले एपिसोड्स पाहण्यासाठी पाहा ‘लाल इश्क’मध्ये दर शनिवार व रविवार रात्री ९ वाजता व रात्री १० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर