चंद्रापासून अवघ्या १ मिनटं दूर व २.१ किलोमीटर अंतरावर असतांना विक्रम लँडरशी भारताचा संबंध तुटला आणि गेले ५५ दिवस ज्याची भारतासह अख्खा जग डोळे लावून बसला होता त्या स्वप्नाला हुलकावणी मिळाली.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सोहळा पाहण्यासाठी बंगलोर येथील इस्रोच्या मुख्यालयात हजर होते या वेळेस बोलताना ते म्हणाले ” जीवनात चढ उतार येत असतातच, देशाला व मला स्वतःला तुमचा अभिमान आहे. सरकार सदैव तुमच्या पाठीशी राहील व आपली अंतराळ मोहीम अशीच पुढे जोमाने सुरू राहील.
त्याच प्रमाणे शनिवारी सकाळी पुन्हा पंतप्रधान इस्रोच्या मुख्यालयात आले व या मोहिमेत भाग घेतलेल्या शास्त्रज्ञांना संबोधित करतांना म्हणाले ” आपण भारतमाते साठी जगणारे लोक आहात, आपल्या चेहऱ्यावरील उदासीनता मी अनुभवली आहे. तुंही ध्येयाने झपाटलेले होता, शेवटच्या क्षणाच्या अपयशाने तुमचे यश झाकोळले जाणार नाही, आता चंद्रावर जाण्याचे आपले स्वप्न अँखिं प्रबळ झाले आहे. आपण लोण्यावर नाही तर दगडावर रेषा उमटवणारे लोक आहात. इस्रो कधीही हार न मानणाऱ्या संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. विज्ञानात प्रयोग व प्रयत्न असतात तिथे अपयशाला थारा नसतो”
या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व शास्त्रज्ञांच्या जागेवर जाऊन त्यांना हस्तांदोलन केले, या वेळेस निरोप देताना इस्रोच्या या मोहिमेचे प्रमुख के. शिवन यांना अश्रू अनावर झाले असता पंतप्रधानांनी त्यांना आपल्या मिठीत घेत त्यांचे सांत्वन केेले.
चंद्रावर तिरंगा फडकवण्याच्या भारताच्या स्वप्नाला हुलकावणी
+1
+1
+1
+1