“स्वतःच्या आवाजात गाल तर भविष्यात यश तुमचेच” – लता मंगेशकर

” मी गायलेले गाणे गाऊन त्याचा कोणाला फायदा होणार असेल तर यात आनंदच आहे. मात्र या मुळे जी प्रसिद्धी मिळेल ती फार थोड्या अवधी साठी असते, स्वतःच्या आवाजात गाणं गायल्यास तो वेगळेपणा नक्कीच त्यांना या क्षेत्रात पुढे यश मिळू शकेल.” रानु मंडलला फार थोड्या अवधीत मिळालेल्या यशावर लता मंगेशकर यांनी आपले मत व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या “आज पर्यंत इतक्या गायकांनी माझी गाणी गायली आहेत पण त्यांच्या पैकी किती पुढे आले, सुनिधी चौहान व श्रेया घोषाल सोडल्यास, तुम्ही यशाच्या रस्त्यावर जेव्हा पुढे जात असता तेव्हा त्याला कोणतीही मर्यादा नसली पाहिजे.

“आशा ( भोसले ) ने जर आपल्या वेगळ्या आवाजात गाणे गायले नसते तर ती शेवट पर्यंत माझ्या छत्रछाये खाली राहिली असती, पण आज बघा ती कुठल्या कुठे गेली हे एक उत्तम उदाहरण आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेले “एक प्यार का नगमा हैं” हे गाणे गाताना रानु मंडल यांना अतींद्र चक्रवर्ती या व्यक्तीने ऐकले व त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला, त्याला प्रचंड लाईक मिळाले बॉलिवूडवाल्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले गायक हिमेश रेशमिया यांनी तर त्याच्या अगामी ‘तेरी मेरी कहानी’ या चित्रपटासाठी गाणे सुद्धा गाऊन घेतले असून त्याचा मोबदला म्हणून तब्बल सात लाख रुपये दिल्याची चर्चा आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns