यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२४ “मा. डॉ. राणी बंग आणि मा. डॉ. अभय बंग” यांना देण्यात येणार आहे.
सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योगदान देऊन आदिवासी जनतेच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरणाऱ्या डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना सन २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.
चव्हाण सेंटरतर्फे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्ती किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. पाच लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंतीनिमित्त बुधवार, १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सेंटरचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना प्रदान करण्यात येईल.
___________________________