२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत *सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५* च्या शॉर्ट फिल्म, नाटक आणि सिनेमांची अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कलाकृतीचीं नावे जाहीर झाली आहेत. नाटक विभागात अंतिम साठी एकूण २२ नाटकांमधून ६ नाटकं जाहीर झाली आहेत यात १) वर वरचे वधुवर २) उर्मिलायन ३) दोन वाजून बावीस मिनीटांनी ४) ऑल दि बेस्ट ५) मास्टर माईंड ६) थेट तुमच्या घरातून नाट्य विभागाचे परीक्षण भालचंद्र कुबल, मनोहर सरवणकर , रविंद्र आवटी , सतीश आगाशे , राज पाटील आणि शिरीष घाग केले आहे. चित्रपट विभागात एकूण ६२ चित्रपटातून १५ चित्रपटांची घोषणा अंतिम साठी करण्यात आली. यात १) श्री गणेशा २) फुलवंती ३) मोऱ्या ४) शक्तिमान ५) मंगला ६) नवरदेव BSC ऍग्री ७) घरत गणपती ८) छबिला ९) स ला ते स ला ना ते १० ) जिलबी ११) रानटी १२) मुक्काम पोस्ट देवाचे घर १३) लोकशाही १४) अल्याड पल्याड १५ ) १ नंबर चित्रपट विभागाच्या परीक्षणाचे काम रमेश मोरे , मनोहर सरवणकर , विजय राणे , अशोक कुलकर्णी , सुनील खेडेकर आणि आराधना देशपांडे यांनी पाहिले.तर शॉर्ट फिल्म विभागाचे परीक्षण महेंद्र पाटील , अनिष म्हैसाळकर , पद्माकर गांधी आणि सीमा कुलकर्णी यांनी पाहिले. यंदाचा मानाचा नाट्य महोत्सव मंगळवार दि. १ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वा ज्येष्ठ लेखिका प्रतिभा मतकरी , अभिनेत्री सुप्रिया विनोद , अभिनेत्री पद्मश्री विजय कदम यांच्या शुभ हस्ते होणार आहे.या नाट्यमहोत्सवाचे प्रवेशद्वार कै.अभिनेते विजय कदम यांच्या नावे असणार आहे. रसिक प्रेक्षकांना कमी दरात दर्जेदार नाटकं पाहता यावीत म्हणून ३००,२००,१०० रुपये तिकीट दर ठेवला आहे.हा महोत्सव दिनांक १, २, आणि ३ एप्रिल मध्ये मोठया दिमाखात रंगणार आहे.तर मानाचा “सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सव” सोमवार दिनांक ७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. प्रसिद्धअभिनेते संतोष जुवेकर , संपादक कांतीलाल कडू आणि निर्माता दत्ताजी जवळगे यांच्या शुभ हस्ते होणार असून चित्रपट महोत्सवाच्या प्रवेशद्वाराला नाव कै. लेखक, गीतकार आणि अभिनेता मंगेश कुलकर्णी आणि कै.अभिनेता अतुल परचुरे यांच्या नावाने असणार आहे.रसिकांना अल्प दरात म्हणजे फक्त १०० ,५० रुपयात सिनेमा पाहता येणार आहे. या समयी शॉर्ट फिल्मचे पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. वरील दोन्ही महोत्सवात अनेक दिग्गज व नामवंत कलाकार,दिग्दर्शक असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष – संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी कळविले आहे.