मी या रंगमंचावर माझ्या वडिलांची लेगसी जपायला आलो आहे – प्रसाद कांबळी
भद्रकाली प्रोडक्शन च्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्या नाटकाने जगभरात मालवणी भाषा पोहोचवली अश्या ” वस्त्रहरण ” या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिर मध्ये शनिवारी रंगला. यावेळेस mumbainews24X7.com शी बोलताना प्रसाद कांबळी म्हणाले प्रेक्षकांचे भद्रकाली वरती असलेले अतोनात प्रेम पाहून मी कृतकृत्य झालो. बाबूजींनी शून्यातून जे सगळं उभारले ते फक्त सांभाळणं हेच माझे आता कर्तव्य आहे.
बाबूजी गेले तेव्हा मोहन वाघ म्हणाले होते, ” मालवणी रंगभूमीच एक सिंहासन मच्छिंद्र कांबळी
यांनी मराठी रंगभूमीवर स्वतः निर्माण केल आणि तो स्वतःबरोबर ते सिंहासन घेऊन गेला “
रेवंडी गावातील एक माणूस जो अशिक्षित होता त्यांनी मालवणी भाषा, मालवणी जेवण, जत्रोत्सव जगभरात पोहोचवले मला असे वाटते की माझ्या वडिलांनी जे केले ते मला आयुष्यात जमणार नाही. मी या रंगमंचावर माझ्या वडिलांची लेगसी जपायला आलो आहे मला काहीही प्रुव्ह करायचे नाही.
भद्रकालीच्या पाच निवडक नाटकांचे प्रत्येकी ५० प्रयोग लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले. यात
पांडगो इलो रे बा इलो! (१९८७),
रातराणी (१९८८),
हलकं फुलकं (१९९८),
सुखांशी भांडतो आम्ही! (२०११)
आणि समुद्र (२०१५) या नाटकांचा समावेश आहे.