जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विंक म्युझिकचा विक्रम

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विंक म्युझिकचा विक्रम

*”जागतिक संगीत दिनाच्या” निमित्ताने विंक म्युझिकने मुंबईतील प्रतिक गांधी आणि राज बर्मन इंडी कलाकार यांच्या सहकार्याने १.७+ बिलियन स्ट्रीम्सचा टप्पा गाठत विक्रम हासील केला*

*विंक स्टुडिओची सुरुवात केल्यावर दोन वर्षांच्या आत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे*

*आगामी संगीत कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या प्लॅटफॉर्मच्या क्षमतेला या कामगिरीमुळे बळकटी लाभली आहे*

*मुंबई, *  विंक म्युझिक, डाउनलोड आणि दैनंदिन सक्रिय वापरकर्ते यांच्यामुळे भारतातील नंबर वन म्युझिक स्ट्रीमिंग ॲप आहे. विंक म्युझिक हे नवोदित संगीत कलावंतांसाठी त्यांची गाणी देशव्यापी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लॉन्च पॅड आहे आणि विंक स्टुडिओच्या स्वतंत्र कलावंतांच्या गाण्यांसाठी विंक म्युझिकने जबरदस्त 1.7+ बिलियन स्ट्रीम्स एवढा उद्योगातील अग्रगण्य टप्पा पार केला आहे. विंक स्टुडिओची सुरुवात केल्यानंतर दोन वर्षांच्या आतच या गाण्यांनी हा टप्पा उल्लेखनीय पद्धतीने पार केला आणि यामुळे स्वतंत्र संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिभावान व उभरत्या कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी विंकची बांधिलकी ठळकपणे पहायला मिळत आहे.

*भारती एअरटेलचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित त्रिपाठी म्हणाले,* “आमची इच्छा होती की आगामी कलावंतांना त्यांच्या संगीताचे पैसे कमावण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावे आणि म्हणून आम्ही विंक स्टुडिओची सुरुवात केली होती. त्याचवेळेस आम्ही आमच्या ग्राहकांना निवडण्यासाठी एक उदार म्युझिक लायब्ररी देऊ केली होती. आम्ही कलावंताला मदत करताना आमचे ग्राहक सामग्रीचा किती आनंद घेत आहेत हे या गाण्यांचे 1.7 बिलियन स्ट्रीम्समुळे स्थापित झालेले आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, आम्ही विंकवरील भाषेच्या विविधतेचे समर्थन करत असताना देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना आम्ही साइन करत आहोत – इतके विंक स्टुडिओ लोकप्रिय झालेले आहे. आमचा आपणास शब्द आहे की विविधता आणणे आम्ही चालू ठेवणार आहोत आणि अधिकाधिक कलावंतांना समृद्ध संगीत कारकीर्द घडविण्यास सक्षम करणार आहोत.”

विंक स्टुडिओची सुरुवात ही देशातील संगीत कलागुण ओळखून कलावंतांना संगीत उद्योगात शाश्वत कारकीर्द घडविण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने केली गेली होती. विंक स्टुडिओ हा कलावंताचा विकास करणारा (आर्टिस्ट ग्रोथचा) पहिला प्लॅटफॉर्म आहे. विंक स्टुडिओने भारतातील कलावंतांच्या समर्थनात क्रांती घडवून आणली आहे आणि वैयक्तिकृत मार्गदर्शन, विस्तृत वितरण आणि कमविण्याच्या संधींद्वारे ते साध्य केले आहे. विंक स्टुडिओ कलावंतांना अनेक संधी सुद्धा उपलब्ध करून देत आहे आणि त्यात इतर म्युझिक लेबल्ससोबत सहकार्य करणे, वेब सीरिजचे बॅकग्राऊंड स्कोअर देणे, ओटीटी, लाइव्ह इव्हेंट्स आणि अशा इतर संधींचा समावेश आहे.

विंक म्युझिक या कलावंतांच्या गाण्यांची एक खास प्लेलिस्ट तयार करून त्यांची शोधक्षमता आणि परिणामी स्ट्रीम्स यांना प्रोत्साहन देत आहे. विंकचा मोठा ग्राहक आधार असून तो कलावंतांना समृद्ध कारकीर्द तयार करण्यासाठी त्यांची पोहोच वाढविण्यास आणि त्यांच्या गाण्यांतून कमविण्यास मदत करत आहे. यामुळे देशभरातील स्वतंत्र कलावंतांची या प्लॅटफॉर्मवर येण्याची संख्या वाढली असून त्यांच्या संगीताला मोठा प्रेक्षकवर्ग लाभत आहे. आजपर्यंत, प्लॅटफॉर्मने 2000+ कलावंतांना कल्पक आउटलेट्स उपलब्ध करून देऊन मदत केली आहे आणि त्यासोबतच त्यांचे कमाईचे आणि शोधाचे प्रश्न सोडविलेले आहेत.

उभरत्या कलावंतांसोबतच निखिता गांधी, विशाल दादलानी, राहत फतेह अली खान यांसारखे प्रस्थापित कलावंत सुद्धा विंक स्टुडिओ सोबत आपले संगीत प्रदर्शित करत आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे प्रतीक गांधी, राज बर्मन, हर्षा प्रवीण आणि रीना गिल्बर्ट यांसारख्या कलावंतांच्या कारकिर्दीला विंक स्टुडिओचे अव्वल कलाकार बनविण्यात यश मिळाले आहे.

विंकने स्वतंत्र सिंगल्सच्या वितरणाचे सुद्धा समर्थन केले आहे जसे की मंज म्युझिक आणि अनुषा दांडेकर यांचे “लव्ह टोकन”; त्याचसोबत के के मेनन आणि स्वस्तिका मुखर्जी कलावंत असलेल्या “लव्ह ऑल” या चित्रपटाच्या प्रसारासाठी एलजीएफ स्टुडिओस सारख्या स्वतंत्र निर्मात्यांना पाठिंबा सुद्धा दिला आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns