सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना देण्यात आला.

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नाट्य विभागामध्ये भरत एंटरटेनमेंट प्रस्तुत “अस्तित्व” सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार रोख रक्कम 50 हजार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला .चित्रपट विभागात “श्यामची आई” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला तर टीव्ही मालिका विभागात “ठरलं तर मग” स्टार प्रवाह ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली तसेच लक्षवेधी मालिकेमध्ये ‘सावली होईल सुखाची’ सन टीव्ही आणि “काव्यांजली” कलर्स मराठी या मालिकेला मिळाले. यंदाचा मानाचा आणि सन्मानाचा “सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना देण्यात आला. हा पुरस्कार अभिनेते अंकुश चौधरी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर महाराष्ट्र कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र आवटी आणि सांस्कृतिक कलादर्पणचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आला. यंदाच्या चित्रपट विभागामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गौरी देशपांडे (श्यामची आई ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संदीप पाठक ( श्यामचीआई), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नम्रता संभेराव ( एकदा येऊन तर बघा) सर्वोत्कृष्ट  विनोदी कलावंत गौरव मोरे ( बॉईज-4) यांना पुरस्कार मिळाला. नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता भरत जाधव ( अस्तित्व) आणि अक्षय मुडावदकर( चूक भूल द्यावी घ्यावी ), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून चिन्मयी सुमित, शर्वरी बोरकर ( जन्मवारी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सुनील तांबट ( २१७ पद्मिनी धाम ) ,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अमृता पवार ( २१७ पद्मिनी धाम ), यांनी पुरस्कार मिळवले. टी.व्ही मालिका विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेता हर्षद अतकारी (कुण्या राजाची तू ग राणी) स्टार प्रवाह, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जुई गडकरी ( ठरलं तर मग) स्टार प्रवाह, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विभागून –  किरण माने (सिंधूताई माझी आई) स्टार प्रवाह, सुनील तावडे ( पिंकीचा विजय असो) स्टार प्रवाह, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुप्रिया विनोद ( सावली होईन सुखाची) सन मराठी यांना मिळाले.

सांस्कृतिक कलादर्पणचा ‘ सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर’ हा पुरस्कार अलबत्या गलबत्या बालनाटयातील कन्याराजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे यांना मिळाला.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns