….नट जास्ती हुशार असले तर ते त्रासदायक असतात – सई परांजपे

….नट जास्ती हुशार असले तर ते त्रासदायक असतात – सई परांजपे

*प्रेक्षकांसमवेत डायरेक्ट नाळ जोडली गेल्यामुळे रंगभूमी हे जिवंत माध्यम आहे”
*माझी सुरवात  आकाशवाणी पासून झाली असल्याने आकाशवाणी वरील माझे प्रेम अबाधित आहे.*
सई परांजपे लिखित दिग्दर्शित “इवलेसे रोप” हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत असून यात प्रमुख भूमिकेत मंगेश कदम व लीना भागवत तर सहाय्यक भूमिकेत मयुरेश खोले, अनुष्का गीते, अक्षय भिसे दिसणार आहेत.
यावेळेस बोलताना सई परांजपे गमतीने म्हणाल्या नट जास्त हुशार असले तर ते
त्रासदायक असतात. मंगेश व लीना हे हुशार असून ते मला सुद्धा काही गोष्टीत काही बदल सुचवत होते आणि नंतर विचार केल्यावर मलाही ते पटत होते आणि हे पटत नव्हते तिथे मात्र मी ठाम राहिले.
आपल्या आजूबाजूच्या जोडप्यांची गोष्ट आहे. भानू आणि माधव या दोघांच्या संसाराचा हा प्रवास आहे. सोबतीने अनेक पावसाळे पाहिल्यानंतर आता ते ‘माई-बापू’ होऊन गेले आहेत. आयुष्याच्या सायंकाळी अचानक एक ‘दोघात तिसरा’ त्यांच्या घरात येतो! एक इवलंसं रोप त्यांच्या घरात येतं. त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, नव्या आठवणीही तयार होऊ लागतात. आपल्याला एकमेकांशी, जगण्याशीही बांधून ठेवणारं इवलंसं रोप व माई-बापू यांची ही गोष्ट आहे. सई परांजपे यांनी आपल्या नेहमीच्या नर्मविनोदी, खुमासदार तरी संवेदनशील पद्धतीने ही गोष्ट उलगडली आहे.
खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई निर्मित आणि रावेतकर गृप प्रस्तुत या नव्या नाटकाचा  ८ मार्च २०२४ रोजी, गडकरी रंगायतन, ठाणे येथे दु. ४:३० वाजता शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
नेपथ्य प्रदीप मुळ्येंचे असून, संगीत विजय गवंडे यांनी दिलेले आहे.

IPRoyal Pawns