‘गुल्हर’ चित्रपटाचा रोमहर्षक ट्रेलर लाँच…

‘गुल्हर’ चित्रपटाचा रोमहर्षक ट्रेलर लाँच…

मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘गुल्हर’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. अनोख्या शीर्षकामुळं उत्सुकता वाढवणाऱ्या ‘गुल्हर’मध्ये नेमकं काय पहायला मिळणार त्याची झलक दाखवणारा ट्रेलर रसिकांच्या पसंतीस पडत आहे. कुतूहल वाढवणाऱ्या ट्रेलरला अत्यंत कमी वेळात सोशल मीडियावर तूफान रिस्पाँस मिळत आहे, जो चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पूरक वातावरण निर्मिती करणारा आहे.

आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी ‘गुल्हर’ची निर्मिती केली आहे. ‘गुल्हर’ या चित्रपटात ११ वर्षांच्या एका मुलाची कथा पहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत होतं, पण हा चित्रपट त्याहीपेक्षा बरंच काहीतरी सांगणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘गुल्हर’ नावाच्या मुलाची ही कथा आहे. एका अल्लड मुलाच्या कथानकाची सांगड गुलाबी प्रेमकथेशी घालण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये असलेली गोष्ट एका उनाड मनाची, कथा प्रेमाची अन मायेची, कधीतरी आपण आपले प्रारब्ध ठरवतो, परंतु कधीतरी आपले प्रारब्ध आपल्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवत असते, अनुभवा अनोख्या बंधांची अप्रतिम कहाणी!! ही ट्रेलरमधील वाक्ये ‘गुल्हर’बाबतची उत्सुकता वाढवणारी आहेत. शिवानी बावकरच्या मुखातील ‘मनात आलं तर प्रेम करीन, नाहीतर एखाद्याचा गेम करीन’, हा डायलॅाग तिच्या बिनधास्त व्यक्तिरेखेचं दर्शन घडवणारं आहे. मोशन पोस्टरप्रमाणेच ‘गुल्हर’च्या ट्रेलरलाही अजय गोगावलेच्या आवाजातील ‘आली लहर आली लहर आली…’ या गाण्याची जोड देण्यात आली आहे. अर्थपूर्ण आणि कुतूहल जागवणारे संवाद ही या ट्रेलरची मुख्य जमेची बाजू आहे.

आजवर या चित्रपटानं देश-विदेशातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं सर्वच ठिकाणी कौतुक झालं आहे. रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांच्या यात भूमिका आहेत. ‘गुल्हर’ची कथा मोहन पडवळ यांच्या लेखणीतून अवतरली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखनाचं काम केलं आहे. सिनेमॅटोग्राफीसोबतच संकलनही कुमार डोंगरे यांनी केलं आहे. पद्मनाभ गायकवाड यांनी गीतरचना संगीतबद्ध केल्या असून, पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी केलं आहे नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांचं, तर ध्वनी आरेखन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांचं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत, तर डिआय योगेश दीक्षित यांनी केलं आहे. हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns