“मी सल्ला घेऊ शकतो पण मला जे मांडायचे आहे तेच मी मांडतो.” – मकरंद माने

*‘सोयरीक’* जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात.

कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि ‘निभावण्याच्या’ ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याकड़े आणि त्याबाबत बंधनं असू नयेत, असा विचार करणारी आजची जनरेशन आहे. यावर ‘सोयरीक’ या आपल्या चित्रपटा विषयी मुंबई न्यूज 24×7 शी बोलतांना दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, ” लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का?

‘सोयरीक’ किंवा ‘लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. ‘समाजाच्या दोन आर्थिक स्तरांच्या विचारपद्धतीत बहुतांशी वेळा फरक दिसून येतो. एकीकडे स्वाभिमानाला जपणारी, जातीपातीचा विचार करून आपल्या समाजाशी एकनिष्ठ राहू पाहणारा वर्ग तर दुसरीकडे समाजातील आपली प्रतिष्ठा, ऐश्वर्य, उच्च-नीचता याला प्राधान्य देत संबध जोडणारी मंडळी यांचा संघर्ष घडताना आपण पहातो, अनुभवतो. *‘सोयरीक’* जोडताना या भावना प्रकर्षाने आपल्यासमोर येतात. मुलामुलांच्या आवडीनिवडीचा विचार न करता, आपल्या सोयीनुसार जोडलेली *‘सोयरीक’* अनेक समस्यांना जन्म देते. *‘सोयरीक’* चित्रपट याच विषयाला आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.

मी प्रेशर घेत नाही रिंगण च्या वेळेस निर्मात्यांना काहीतरी वेगळे हवे होते तसे त्यांनी मला बोलूनही दाखवले पण मी तेव्हा पूर्णपणे ठाम होतो की मला प्रेक्षकांना जो सिनेमा दाखवायचा आहे तोच दाखवणार कारण तो माझा चित्रपट आहे मला जज करायचे असेल तर माझ्या मनातले मला भावणारी गोष्ट यावयास हवी सोयरीक ची कथा मी आधी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली होती पण कोविड काळात मला माझी गोष्ट मिळाली आणि ती मी माझ्या पद्धतीने मांडली मी सल्ला घेऊ शकतो पण मला जे मांडायचे आहे तेच मी मांडतो.

शशांक शेंडे बद्दल बोलायचे तर ते दिग्दर्शकाचा समोर कोरी पाटी घेऊन येतात ते दिग्दर्शकाला सरेंडर होणारे अभिनेते आहेत. म्हणून मला जे त्यांच्याकडून पाहिजे असते ते मी काढून घेतो तिथे मला ते इतके सिनिअर फॅक्टर आहेत याचे बर्डन येत नाही.

मला माझ्या बरोबर काम करणाऱ्याने मला वेळ द्यायला पाहिजे तो माझा स्वार्थ आहे म्हणा ना मुख्य शूटिंगच्या अगोदर माझी एक प्रोसेस असते, वर्कशॉप असते आणि तेव्हा मला त्या कलाकाराचा वेळ हवा असतो कारण त्या कलाकारातील कला, दिग्दर्शक या नात्याने मला प्रेक्षकां पर्यंत करेक्ट पोहोचवायची असते”.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns