एमपीएससीची परीक्षा आता २१ मार्चला

एमपीएससीची परीक्षा आता २१ मार्चला

राज्यात कोरोना झपाट्याने पसरत चालल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ तारखेला होणारी एमपीएससीची
राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती मात्र त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यां मध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या गोष्टीत लक्ष घालावे लागले व ही परीक्षा येत्या आठ दिवसात होईल व त्याचे वेळापत्रक उद्याच जाहीर होईल असे सांगण्यात आले. त्यानुसार आज लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून सदरहू परीक्षा आता २१ मार्चला घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन
परिपत्रकानुसार २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या
ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये
कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७
मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र
दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व
परीक्षा घेण्यात येणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns