काँग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधानांनी दिल्लीतील एम्स मध्ये घेतली कोरोनाची लस.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या चारशे कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता.
आरटीओ तर्फे महाविद्यालयात लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार लर्निंग लायसन्स.
आज पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
१ मार्च -पहिला दिवस –
राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
२, ३ मार्च – दुसरा, तिसरा दिवस –
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
४, ५ मार्च – चौथा, पाचवा दिवस –
पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
६, ७ मार्च -सहावा, सातवा दिवस –
शनिवार, रविवारची सुट्टी
८ मार्च -आठवा दिवस –
अर्थसंकल्प सादर होणार
९ मार्च – नववा दिवस –
शासकीय कामकाज
१० मार्च – दहावा दिवस-
अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता
सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यपाल.
अधिवेशनावर कोरोनाचे सावट विधान भवनाशी संबंधित २५ जण कोरोना बाधित.
देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरवात.
देशभरात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास आज पासून (१ मार्च) सुरूवात. या टप्प्यात ६० वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे या लसीसाठी सरकारी रुग्णालयात कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.