मागच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. मात्र २०२१ हे नवीन वर्ष आपल्या देशासाठी आनंद घेऊन आले आणि कोरोना आटोक्यात आला. या महामारीच्या अति कठीण काळात अनेक लोकांनी स्वइच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान कार्य केले. त्यांच्या याच कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने तयार केले आहे. ‘हिरो सरपंच’ नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉन्ग असून ‘आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी’ असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचे प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे. या कठीण काळात हाच आरोग्यदूत असणारा सरपंच हिरो ठरला आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला
आरोग्यदूत सरपंच ठरला हिरोलाही भारी
+1
+1
+1
+1