मराठीतील नव्या चित्तथरारक वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू

मराठीतील नव्या चित्तथरारक वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसमुळे वेबसिरीजना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग वेबसिरीजकडे वळला आहे.
नवोदित दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ याने नव्या वे2बसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली असून
शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
”ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे.  या वेबसिरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी बऱ्याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी  देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत. हीच सदिच्छा.” दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात.
लेखक अजिंक्य ठाकूर वेबसिरीजच्या शुभारंभाविषयी म्हदणतात, ”बऱ्याच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होत आहे. ह्यात मोरयाचे आशीर्वाद आणि संपूर्ण टिमचे कष्ट जोडलेले आहेत. आता श्रीं नी ह्याची मुहूर्तमेढ रोवली आहे म्हटल्यावर पूर्णत्वाला नेण्याची जवाबदारी ही त्यांचीच राहते. ह्या वेब शोचा लेखक म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा कायम ऋणी राहीन.”

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns