गझल मंथन साहित्य संस्था : गझल मंथन समूहाच्या अधिकृत यु-ट्यूब चॅनेलचा वर्धापन दिन तसेच गझल मंथन चे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखडे तसेच उपाध्यक्ष देवकुमार सर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून, गझल मंथन परिवार आपल्यासाठी घेऊन येत आहे आजवरचा सर्वात दीर्घकाळ चालणारा आणि सर्वात जास्त सहभागी संख्या असलेला गझल अमृत महागझलोत्सव. ५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १० वाजेपर्यंत हा महागझलोत्सव असणार आहे. हा खुला मुशायरा असून समूहातील प्रत्येक सदस्याला ह्या मुशायरामधे उत्स्फूर्त सहभाग घेता येईल. गझल मंथन परिवारातील प्रत्येक सदस्याचे यात स्वागत आहे.
या महोत्सवाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार आ. नितीन देशमुख सर आहेत. स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार आ. भूषण कटककर (बेफिकीर) सर आहेत.
सदर महागझलोत्सवाचे सूत्रसंचालन ५ ऑगस्ट २०२० रोजी सुप्रसिद्ध गझलकार आ. रत्नाकर जोशी सर आणि ६ ऑगस्ट २०२० रोजी सुप्रसिद्ध गझलकार आ. डॉ. कैलास गायकवाड सर करणार आहेत.
या महागझलोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्रीमती आदरणीय उर्मिलामाई बांदिवडेकर, शरयूताई शहा, सुनंदामाई पाटील, सुप्रियाताई जाधव, डॉ. स्नेहलताई कुलकर्णी, तसेच सर्वश्री डॉ. शिवाजी काळे, प्रमोद खराडे, निलेश कवडे, आदरणीय संजय गोरडे, समीर बापट, जयदीप विघ्ने, शाम खामकर, अभिजीत काळे, प्रसाद कुलकर्णी, मसूद पटेल, डॉ. संतोष कुलकर्णी, कालिदास चवडेकर आदी मान्यवर उपस्थित असतील.
सन्माननीय उपस्थिती सर्वश्री विशाल राजगुरु, डॉ. राज रणधीर, आत्माराम जाधव, आत्तम गेंदे , प्रशांत पोरे, गोपाल मापारी, राज शेळके, शेखर गिरी, संदीप जाधव , रघुनाथ पाटील, दिनेश भोसले, नंदकिशोर आगळे, चंद्रकांत कदम आणि सर्वश्रीमती डॉ. अमिताताई गोसावी, सुनंदाताई शेळके यांची असणार आहे.
या महागझलोत्सवात गझलमंथन समूह १, गझलमंथन समूह २, अभ्यास समूह, सगळ्या कार्यशाळेतील सदस्य तसेच गझलमंथन समूहाबाहेरील परंतु महाराष्ट्रातील समस्त गझलकार आणि गझलकारा यांचा आपुलकीचा सहभाग असणार आहे.
या महागझलोत्सवाचे नियम:
१. प्रत्येकाने आपल्या गझलेचे विडीयो चित्रीकरण करून समूहात पोस्ट करावे,
२. हा विडीयो यु-ट्यूबवर तसेच फेसबुक पेज प्रसिद्ध होणार असल्याने आपण तो इतर कुठेही पोस्ट करू नये. विडीओ प्रसाराचे सर्व हक्क गझल मंथन कडे राहातील,
३. विडीयो शूट करताना मोबाईल आडवा करून (लॅन्डस्केप पोझीशन मधे) केलात तर सोशल मिडीयावर पोस्ट झाल्यावर सुंदर आणि ठळक दिसेल,
४. तुम्ही दोन दिवसात कधीही पोस्ट करू शकता फक्त एखादा विडीयो आधी पोस्ट झाला असेल, तर किमान पाच मिनिटांचा अवधी मधे असू द्या, जेणे करून रसिकांना आधीच्या पोस्टला दाद देण्यास आणि सूत्रसंचालकास त्याचे विवेचन करण्यास अवधी मिळेल,
५. सूत्रसंचालन ही स्वेच्छेने घेतलेली जबाबदारी असल्याने संचालक महोदय हे वेळात वेळ काढून भाष्य करतील.
सदर महागझलोत्सव गझलक्षेत्रात एक इतिहास घडवणार आहे. दोन दिवस सलग चालणाऱ्या या मुशायऱ्याचा गझल अमृत महामहोत्सव साजरा होणार आहे. या महागझल महोत्सवाबद्दल अधिक माहितीसाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव जयवंत वानखडे यांच्याशी 9823645655 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे सर यांच्यातर्फे करण्यात येत आहे. या महागझल महोत्सवाची तांत्रिक जबाबदारी गझल मंथन साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष देवकुमार पार पाडत आहेत.
या महागझल महोत्सवात गझलकार आणि गझलकारा यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष मनोज वराडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.