अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा नुकतीच संपन्न झाली असून या सभेत संस्थेची नवीन घटना लागू झालेली असून त्यानुसार द्वितीय उपाध्यक्ष म्हणून विजय खोचिकर, सहकार्यवाह म्हणून चैत्राली डोंगरे व निकिता मोघे यांची निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्य (संचालक) म्हणून रवी गावडे (कोल्हापूर) व रत्नाकांत जगताप (मुंबई) यांची निवड करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र येड्रवकर. पुण्याचे नूतन महापौर मुरलीधर मोहोळ नूतन नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष ममेघराज राजेभोसले प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार तसेच इतर पदाधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते.
+1
+1
+1
+1