सोमवारी २१ ऑक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत कोणतीही अनुचित घटना घडू नये या साठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्य राखीव दलाच्या १२ तुकड्या केंद्रीय निमलष्करी दलाच्या २२ तुकड्या, ४० हजार पोलीस, २७०० होमगार्डस याबरोबरच आवश्यकतेनुसार सुरक्षितते साठी ड्रोनचा उपयोग करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दंगल नियंत्रण पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान शांततेत पार पडण्यासाठी आतापर्यंत ५२५४ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, २०४३ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहेत तर ७३५७ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडून हमीपत्रे घेण्यात आली आहेत.
तीन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पायी गस्त, नाकाबंदी, वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन यावर भर दिला जात आहे.
शहरांमध्ये १० तर उपनगरात २६ मतदारसंघ असून मतदारसंघातील १५३७ मतदान केंद्रामधील ९९९१ बुथवर सोमवारी मतदान होणार आहे.
मतदानासाठी मुंबईत कडक बंदोबस्त….
+1
+1
+1
+1