*मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार….*
*शातिर आता १३ जून पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…*
मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट निर्माण होतात, म्हणजे प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट येणार हे निश्चित आहे. परंतु मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावर कोणत्याही संस्थेचे, चित्रपट महामंडळाचे नियंत्रण नसल्याने अनेकदा तीन – चार मराठी चित्रपट एकाच आठवड्यात येतात यामुळे कोणत्याच चित्रपटाला प्राइम टाइम मिळत नाही, २३ मे रोजी तर तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. ही मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी शातिर द बिगिनिंग च्या निर्मात्यानी एक पाऊल टाकले असून आता १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.