आता माहोल टाईट, आला बुंगा फाईट… शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!
मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” हे मराठी गाणंही आता रसिकांच्या पसंतीस उतरतंय.
गायक आनंद शिंदे ह्यांनी हे गाणं गायलं आहे आणि नुकतच त्यांनी प्रेक्षकांचं लाईव्ह मनोरंजन केलं आणि त्यांना प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. गावरान भाषा आणि लोकसंगीताची छाप या गाण्यात पहायला मिळते. “बुंगा फाईट” या गाण्याला ओंकारस्वरूप ह्यांनी संगीत दिलं आहे. तर सुहास मुंडे यांचे शब्द आहेत. ‘सजना’ २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.