“आपण हवे हवे असे वाटतानाच निघून जाण्यात मजा आहे,” दिवंगत विजय कदम यांनी पद्मश्रीला सांगितलेले शेवटचे वाक्य

“आपण हवे हवे असे वाटतानाच निघून जाण्यात मजा आहे,” दिवंगत विजय कदम यांनी पद्मश्रीला सांगितलेले शेवटचे वाक्य

१० ऑगस्टला हास्य सम्राट, हसरा व तितकाच मनमिळावू माणूस विजय कदम यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने 23 ऑगस्टला यशवंत नाट्य संकुलात प्रार्थना सभा आयोजित केली होती यावेळेस चित्रपट क्षेत्रातील दिग्गज विजय कदम यांना आदरांजली वाहण्यासाठी आले होते.

याप्रसंगी सचिन पिळगावकर म्हणाले “विजय हा अनसंग हिरो होता. विजय आज जरी आपल्यात नसला तरी त्याच्या स्मृती आपल्या स्मरणात नेहमीच राहतील असे मला वाटते. त्याला त्याच्या कुवती पेक्षा फारच कमी मिळाले पण त्याबद्दल त्याने कधी तक्रार केली नाही, जे आहे त्यात तो समाधानी होता त्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा. परमेश्वर जेव्हा कोणाला माणूस म्हणून जन्माला घालतो पण त्याचबरोबर त्याला कलागुण देत असेल तर तो फक्त माणूस म्हणून राहत नाही तर कलावंत होतो आणि कलावंताला आपण फक्त श्रद्धांजली नाही तर आदरांजली व्हायला हवी.

 

पुरू बेर्डे म्हणाले “विजयला इतक्या लवकर श्रद्धांजली वहावी लागेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं कारण मधल्या काळात तो बरा होत होता. त्यानंतर आमचं एका प्रोजेक्टवर बोलणंही चालू होतं. विजयची आणि माझी ओळख म्हणजे आम्ही जागरण या विषयावर संशोधन करत होतो, तेव्हा आमच्या टीम मध्ये विजय हा फोटोग्राफर होता. तेव्हा मला विजय हा फक्त आय एन टी चा फोटोग्राफर आहे एवढेच माहिती होतं. हेगडी प्रधान च्या रूपाने मला विजय कदम मधील टॅलेंट दिसले आणि मला माझा हेगडी प्रधान मिळाला.

टुरटुर या नाटकात पहिले पंचवीस प्रयोग विजय कदम हा अतिशय फेमस होता मग २५ प्रयोगानंतर त्याच्याबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे आला व या दोघांनी मिळून टुरटुर ला एका उंचीवर नेले. टुरटुर मधील विजय कदम ची कंडक्टरची भूमिका प्रचंड गाजली नाटकात विजय घंटा वाजवत असे.

 

पद्मश्री आपल्या जोडीदार बद्दल म्हणाल्या विजयच्या स्वभाव हा खूप छान होता व तो सर्वांना सदैव हसवत ठेवायचा. १० ऑगस्टला जेव्हा विजय गेला तेव्हा मला भेटणारा प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हा मी त्यांना सांगायचे, अरे जगायला हसवणारा माणूस जग सोडून गेलाय त्याला वरती हसवायची गरज आहे म्हणून तो तिथे गेला. त्याला हसत निरोप द्या विजय नेहमी मला म्हणायचं माणूस असताना कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही

आपण हवे हवे असे वाटताना निघून जाण्यात मजा आहे असे विजय मला नेहमी म्हणायचा.

प्रार्थना सभेला हजर असलेले कलावंत –

पद्मश्री कदम , गंधार कदम, विजय पाटकर , पुरूषोत्तम बेर्डे , जयवंत वाडकर , सचिन पिळगावकर , महेश मांजरेकर ( नाटक ), रोहिणी हट्टंगडी, विजय केंकरे , अजित भुरे ,राजेश भोसले ,समीर दीक्षित , रत्नकांत जगताप,अजय जाधव ,अभिराम भडकमकर, आनंदा कारेकर , दुष्यांत वाघ ,कार्तिक पाल, श्रीनिवास नार्वेकर, अविनाश मराठे ,नम्रता कदम , श्री कदम , श्रीमती कदम ,राजू राणे ,शितल कल्हापुरे ,प्रमोद मोहिते , सचिन चिटणीस ,शितल करदेकर ,उमेश ठाकूर ,दिनेश रिकामे ,रुपेश मिरकर ,विजय राणे ,चंद्रशेखर सांडवे ,महेश कपोडसकर , विनोद डावरे , विनय गिरकर , कय्युम काझी , यशवंत , दिपक सावंत ,सुनील सावंत,

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns