रामचंद्र चितळकर अर्थात श्री रामचंद्र

भोली सुरत दिलके खोटे, नाम बडे और दर्शन खोटे किंवा शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो अशी अलबेला या चित्रपटातील एकाहून एक सरस गाणी देणारे प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र यांच्या दोन घरांची टिपलेली छायाचित्रे इथे दिली आहेत. त्यातील एक छायाचित्र आहे दादरच्या शिवाजी पार्क येथील साई साऊली या इमारतीचे. ते ठिकाण पाहिले. ही इमारत आचार्य अत्रे जिथे राहत होते त्या इमारतीच्या शेजारीच आहे. सी. रामचंद्र यांचे पूर्वी तिथे वास्तव्य होते. त्यांचा पुण्यालाही बंगला होता. त्याचे छायाचित्र उजव्या हाताला दिले आहे. या बंगल्यासमोर त्यांच्या नावाचा नीलफलकही लावला आहे. शिवाजी पार्क परिसरात सी. रामचंद्र यांच्या नावाने चौक असून त्याचा फलकही सोबत दिला आहे. सी.रामचंद्र यांनी माझ्या जीवनाची सरगम नावाचे अप्रतिम आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे मुखपृष्ठही तुम्ही या अल्बममध्ये पाहू शकता. सर्व छायाचित्रे बारकाईने पाहा. सी. रामचंद्र यांनी सुमारे १०६ चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या नावातले सी. म्हणजे चितळकर. हे त्यांचे आडनाव आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns