इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना मनाचे श्लोक शिकवले जात नाही हा त्रासदायक मुद्दा आहे – विक्रम गायकवाड
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरीत्रा वर ‘रघुवीर’ हा चित्रपट येत असून त्यात रामदास स्वामींची भूमिका
विक्रम गायकवाड हे साकारत असून त्यांच्याशी mumbainews24x7.com ने केलेली बातचीत
समर्थ रामदास स्वामीं वरती हा येणारा पहिला चित्रपट असून रामदास स्वामींवर या अगोदर चित्रपट यावयास हवा होता असे मत रामदास स्वामींची भूमिका करणारे विक्रम गायकवाड यांनी मांडले पण मला आनंद आहे मी या चित्रपटात रामदास स्वामींची भूमिका करतोय.
रामदास स्वामींचे २०५ मनाचे श्लोक, सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती, भीमरूपी हे असे गेले चारशे वर्ष अजूनही आपल्या मनात आहे. आणि ते अजूनही चारशे वर्ष राहणार आहे मात्र इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना मनाचे श्लोक शिकवले जात नाही हा त्रासदायक मुद्दा आहे. कारण इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्याने मराठी लोकांचे मराठी पण कमी होत चालले आहे. तरी मला विश्वास आहे की रामदास स्वामींचे विचार लुप्त होणार नाहीत काही ना काही नवीन मार्ग येतील, आता हा रघुवीर चित्रपट येतोय तो लोक पाहतील व त्यातून काही बोध घेतील.
रामदास स्वामींची भूमिका करण्या अगोदर मी त्यांची कित्येक पुस्तक वाचली सज्जनगडावर जे समर्थ सेवा मंडळ आहे त्या लोकांनी खूप मदत केली रामदास स्वामींचे राहणीमान, चालणे, व्यायाम करणे हे सगळे मी तिथेच शिकलो रामदास स्वामींचा मूळ विचार काय होता जसे की अकराशे मठ स्थापन करणे, अकरा मारुती, मनाचे श्लोक, दासबोध नुसतीच भक्ती करण्याने तुम्हाला शक्ती नाही मिळणार शक्ती कमावली तर तुम्हाला भक्ती करता येईल हे रामदास स्वामींनी शिकवले.