*लुब्रिझोलने महाराष्ट्रात भूसंपादनाची घोषणा केली, भारतात सर्वात मोठी उत्पादन सुविधा उभारण्याची कंपनीची योजना आहे*
*लुब्रिझोलने वाढत्या प्रादेशिक मागणीची पूर्तता करण्यासाठी वाहतूक आणि औद्योगिक बाजारपेठ आणि इतर वाढत्या क्षेत्रांसाठी स्थानिक पातळीवर पुरवठा करण्यासाठी औरंगाबादमध्ये 120 एकर जमीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली*
*मुंबई, भारत – (जुलै 30, 2024)* – स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये अग्रगण्य असलेल्या, लुब्रिझोल कॉर्पोरेशनने आज औरंगाबाद, भारत येथे 120 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली, जिथे सुरुवातीला क्षेत्राच्या वाढत्या वाहतूक आणि इंडस्ट्रियल फ्लुइड मार्केटला पाठिंबा देण्यासाठी एक नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची त्यांची योजना आहे. *प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे $200 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीचा समावेश आहे,* जी कंपनीची भारतात आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे आणि या क्षेत्रात आधीच केलेल्या गुंतवणुकीवर आधारित आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, हा प्लांट कंपनीची जागतिक स्तरावर दुसरी सर्वात मोठी उत्पादन सुविधा आणि भारतातील सर्वात मोठी उत्पादन सुविधा बनेल. पुढील काही वर्षे हे बांधकाम टप्प्याटप्प्याने सुरू राहील आणि भविष्यात विस्तारासाठी संधी मिळेल.
*फ्लॅव्हियो क्लिगर, अध्यक्ष, लुब्रिझोल अॅडिटीव्स म्हणाले,* “लुब्रिझोलने भारतात पाच दशकांहून अधिक काळ अर्थपूर्ण गुंतवणूक केली आहे. ही नवीन अत्याधुनिक उत्पादन सुविधा आम्हाला भविष्यात इतर लुब्रिझोल व्यवसायांना आणि क्षेत्राना पाठिंबा देण्याच्या क्षमतेसह, आमच्या अॅडिटीव्स व्यवसायासाठी स्थानिक क्षमता आणि योग्यता वाढवण्यास मदत करेल.”
औरंगाबाद प्लांटची घोषणा, या क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर क्षमता वाढवण्यासाठी कंपनीच्या नवीनतम प्रयत्नांचे संकेत आहे. 2023 मध्ये, लुब्रिझोलने गुजरातमधील विलायत येथे जगातील सर्वात मोठ्या सीपीव्हीसी रेझिन प्लांट उभारण्यासाठी, गुजरातमधील दहेज येथील लुब्रिझोलची साइट क्षमता दुप्पट करण्यासाठी, नवी मुंबईत ग्रीस लॅब उघडण्यासाठी आणि देशांतर्गत अतिरिक्त रोजगार वाढ आणि नवकल्पना सक्षम करण्यासाठी आपल्या 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासात या क्षेत्रातील 150 दशलक्ष अमरीकी डॉलर इतकी महत्त्वपूर्ण गुंतवणूकीची घोषणा केली. या व्यतिरिक्त, या वर्षी कंपनीने या क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील जवळचे सहकार्य सक्षम करण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक हब म्हणून आपले पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पुण्यात उघडले आहे.
*भावना बिंद्रा, मॅनेजिंग डायरेक्टर, लुब्रिझोल आयएमईए (भारत, मिडल इस्ट आणि आफ्रिका) म्हणाल्या,* “ल्युब्रिझोलला, भारत-आधारित उत्पादनापासून ते प्रादेशिक नवकल्पना आणि लोकल टॅलेंट मध्ये सतत गुंतवणूक करण्याचे महत्त्व समजते. आम्ही आमच्या ग्राहकांसोबत भागीदार करणे आणि विकासासाठी आणि प्रेरणादायी यशासाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्यास उत्सुक आहोत.”
*नितीन मेंगी, वाइस प्रेसिडेंट लुब्रिझोल अॅडिटीव्ह आयएमईए आणि चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले.* “ही घोषणा आमच्या कर्मचाऱ्यांसाठी, आमचे भागीदार आणि आमच्या क्षेत्रातील आमच्या ग्राहकांप्रती कायम असलेली वचनबद्धता अधोरेखित करते. भारतातील वाढती वाहतूक आणि औद्योगिक बाजारपेठ ही एक मोठी संधी आहे आणि लुब्रिझोल या उद्योगांच्या उज्ज्वल भविष्याचा एक भाग बनल्याबद्दल आनंदी आहे.”
भारतीय मागणी पूर्ण करण्याव्यतिरिक्त, ही साइट आसपासच्या देशांना आणि इतर लुब्रिझोल साइट्सना निर्यातीच्या संधी देखील उपलब्ध करून देतील. लुब्रिझोलच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त 2028 मध्ये या साइटवर उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे.