ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन (८२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! ९०० हून अधिक चित्रपटांमध्ये केलं होतं काम
चंद्र मोहन यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी सकाळी ९.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला.
चंद्र मोहन यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे.
चंद्र मोहन यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार विधी सोमवारी हैदराबादमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.चंद्र मोहन यांनी १९६६ मध्ये आलेल्या रंगुला रत्नम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.पाधारीला वायासू, चंदामामा रावे, अथनोक्कडे, ७ जी वृंदावन कॉलनी, मिस्टर अशा अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी ते लोकप्रिय होते.