जेष्ठ पत्रकार / समीक्षक श्रीराम खाडिलकर लिहिणार mumbainews24x7 साठी

५ सप्टेंबर २०२३ पासून जेष्ठ पत्रकार / समीक्षक श्रीराम खाडिलकर mumbainews24x7 साठी आपल्या ४७ वर्षाच्या प्रवासातील त्यांना आलेले अनुभव Let’s Talk मधून लिहिणार आहेत.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्टचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि १९७६ पासून पत्रकारिता आणि कलासमीक्षक म्हणून काम करीत आहेत. दृश्यकलेचे आणि समकालीन कलेचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिल्पकार वि.पां. करमरकर यांचं चरित्रात्मक लेखन असलेलं “विपांकपर्व” नावाचं अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन केलं आहे. भारतीय तसेच पाश्चात्य कलेच्या इतिहासाबरोबरच सौंदर्यशास्त्राचाही त्यांचा अभ्यास असून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट बरोबरच राज्यातल्या अन्य आर्टस्कूलमध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बरीच वर्षे काम करत आहेत. नाटकं आणि चित्रपट समीक्षक म्हणून तसेच राज्य शासन आयोजित नाट्य आणि चित्रपट पुरस्कार समिती सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

+1
6.3k
+1
3.6k
+1
0
+1
0
IPRoyal Pawns