‘चिरायू’ २०२३ जल्लोषात साजरा
मराठी नववर्षदिनाच्या स्वागतासाठी, त्याच्या पूर्वसंध्येला साजरा होणारा मराठी कलाविश्वाचा ‘चिरायू’ या ही वर्षी हर्षोल्हासात साजरा झाला. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला.
पारंपारिक गोष्टींचा साज लेवून आरोग्याची व अक्षरांच्या गुढीची संकल्पना यंदाच्या ‘चिरायू’ ची खासियत. मराठी कविता तसेच संदेश याच्या माध्यामातून सृजनात्मक अनुभवासोबत तृतीयपंथीयां च्या हस्ते विशेष गुढीची निर्मिती आणि गुढी उभारत नव्या विचारांचा पायंडा ‘चिरायू’ ने यंदा पाडला. यंदा विनोद राठोड,पुंडलिक सानप, विलास हुमणे या प्रकाश योजनाकारांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवेसाठी अर्चना नेवरेकर मंगेश चिवटे (शिवसेना वैद्यकीय कक्ष) यांचा सत्कार करण्यात आला.