‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात

‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात

मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. ‘पिकोलो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ‘संगीतमय’ चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे ‘पिकोलो’ चित्रपट. फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ चित्रपटाची निर्मिती राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.
‘पिकोलो’ संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करीत आहे.

*येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.*

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns