शरद पोंक्षे यांचे प्रमुख कार्यवाहपद त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय

नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर

शरद पोंक्षे यांचे प्रमुख कार्यवाहपद त्यांच्याकडून सभेने काढून घेण्याचा निर्णय

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , मुंबईची तातडीची नियामक मंडळ सभा आज रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी चार वाजता शाहू सभागृह, तिसरा माळा , शिवाजी मंदिर, दादर , मुंबई येथे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेस बहुसंख्य नियामक मंडळ सदस्य महाराष्ट्रातून उपस्थित होते. प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांची सन २०१८ ते २०२३ या कालावधीतील उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज करीत नसल्याने त्यांचे प्रमुख कार्यवाह या पदाचे सर्व अधिकार सभेने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. व त्यांचे सर्व अधिकार सहकार्यवाह यांना देण्यात आले.
मागील नियामक मंडळाची मुदत मार्च २०२३ मध्ये संपत आहे. पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ – २०२८ घेण्याचे नियामक मंडळ सभेत ठरविण्यात आले. यासाठीची मतदार यादी व घटनेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रमुख निवडणूक अधिकारी नियुक्तीबाबत सभेत चर्चा करण्यात आली. निवडणूक अधिकारी निवडीसाठी पाच सदस्यसीय समिती गठीत करण्यात आली आहे. यात भाऊसाहेब भोईर, सविता मालपेकर, सुनील महाजन, विजय कदम, शामनाथ पुंडे असून सदर समिती पाच दिवसात निवडणूक अधिकाराचे नाव जाहीर करेल. तसेच येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. अध्यक्ष नरेश गडेकर सभेची तारीख व वेळ निश्चित करणार आहेत.
कोरोना काळात सभासद केलेल्या सर्व सभासदांची माहिती घेऊन त्यांना सभासदत्व देण्याबाबत पुढील सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns