गडद’च्या गाण्यांना रोहित राऊतच्या संगीताचा साज

‘गडद’च्या गाण्यांना रोहित राऊतच्या संगीताचा साज

‘गडद’ हा सिनेमा अनोख्या टायटलमुळे घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाच्या रूपात मराठी प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंगवर आधारलेला मराठी चित्रपट पहायला मिळणार आहे. मालदीव, गोवा आणि वाईमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘गडद’मध्ये मराठी चित्रपटांमध्ये आजवर कधीही न आलेलं कथानक पहायला मिळणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सादर करण्यात आलेल्या उत्कंठावर्धक कथानकाला कर्णमधूर संगीताचा साज चढवण्याची जबाबदारी हरहुन्नरी मराठमोळा तरुण गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं पार पाडली आहे. मराठी लोकसंगीतासोबतच पाश्चात्य संगीताचीही जाण असणाऱ्या रोहितनं ‘गडद’च्या गीतांना प्रवाहापेक्षा वेगळ्या संगीताचा टच दिला आहे.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदमनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘गडद’चं साँग्ज रेकॅार्डिंग नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. रोहितच्या संगीत दिग्दर्शनाखाली मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतरचना गायल्या आहेत. दिग्दर्शक प्रज्ञेश कदमनं पदार्पणातच एक संगीतमय कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. अभिषेक खणकर यांनी या चित्रपटासाठी तीन गाणी लिहिली असून, तीनही गाणी वेगवेगळ्या मूडमधील आहेत. हा चित्रपट सुपर नॅचरल थ्रिलर स्टाईलचा आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनंच संगीत देण्याचा प्रयत्न रोहितनं केला आहे. यातील एक गाणं रोहित श्याम राऊतनं, दुसरं जुईली जोगळेकरनं, तर तिसरं गाणं हिंदीतील लोकप्रिय गायक दिव्यकुमारनं गायलं आहे. या चित्रपटातील गाण्यांना संगीत देताना समोर असलेल्या आव्हानांबाबत रोहित म्हणाला की, ‘गडद’चं संगीत दिग्दर्शन करताना बरेच किस्से घडले आहेत. हा चित्रपट थ्रिलर असल्यानं थरार आणि भय यांचा संगम घडवणारं संगीत देणं अपेक्षित होतं. त्यामुळं संगीत देताना हा विचार कायम डोक्यात असायचा. संगीताच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या मनात काहीसं भय निर्माण व्हायला हवं असं वाटायचं. तेच मी आणि सर्व गायकांच्या साथीनं संपूर्ण टीमनं करण्याचा प्रयत्न केला असून हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल. ‘गडद’ला संगीत देण्याची प्रोसेस खूप मजेशीर होती. रसिकांसमोर एक वेगळा अल्बम आणि आजवर कधीही न ऐकलेलं संगीत येईल याची खात्री देतो असंही रोहित म्हणाला.

‘गडद’चे लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं आहे. ‘एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’चा विजेता तसंच ‘बिग बॅास’ फेम जय दुधाणे आणि मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन यांची नवी कोरी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. या दोघांसोबत शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांचाही या चित्रपटात भूमिका आहेत. गाण्याची व्यवस्था आदिनाथ पातकर यांनी केली असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns